यावल (दिपक नेवे)- येथील धोबीवाडा परिसरात राहणारी व मागील दीड वर्षापुर्वी शाळेतुन अपहरण करण्यात आलेल्या १३वर्षीय मुलीला उत्तर प्रदेश सारख्या राज्यातुन शोधुन ताब्यात घेण्यात यावल पोलीसांना अखेर यश मिळाले आहे . या संदर्भात पोलीसात भिमसिंग कोळी वय ६५ वर्ष यांनी पोलीसात आपल्या मुलीची मुलगी ट्विंकल कोळी हीचे १९नोव्हेंबर २०१९ रोजी ति शिकत असलेल्या शाळेतुन एका अज्ञात व्याक्तीव्दारे रिक्शात बसवुन तिचे अपहरण करण्यात आले होते.
याच काळात तिची आई मनिषा कोळी ही देखील सुप्रिम कॉलनी जळगाव येथे राहात असतांना तिचा शोध घेतला असता ती देखील मिळुन आली नाही दरम्यान भिमसिंग गंगाराम कोळी यांनी सर्वत्र नात ट्विंकल कोळी आणी त्यांची मुलगी मनिषा कोळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्या मिळुन आल्या नसल्याने निराश झालेल्या आजोबांनी त्या नातीचा व त्यांची मुलगी हिचा अखेर शोध थांबविला होता , मात्र दीड वर्षानंतर अचानक ट्विंकल कोळी हिचा दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता आजोबांना फोन आला आणी तिने आपण कुठ आहे ही सर्व माहीती आजोबांना दिली त्यानंतर यावल पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून , त्या१३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे या दोन सदस्यांच्या पथकास गोरखपुर उतरप्रदेश येथे पाठविले होते.
या दोघ ही पोलीसांनी दोन दिवसाच्या ७०० किलोमिटर लांबीचा प्रवास करून अखेर उत्तर प्रदेशच्या तहसील बडहलगंज जिल्हा गोरखपुर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बच्चा यादव, पोलीस कर्मचारी सुशीलकुमार यादव आणी गृहरक्षक दलाचे प्रदुमल कुमार या पोलीसांच्या मदतीने त्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले असुन , तिला त्यांनी त्याब्यात घेतले आहे.
ट्विंकल कोळी ची आई मनिषा किरण कोळी हीचा मात्र एक महीन्यापुर्वी बडलहगंज येथे रुग्णालयात उपचार घेत असतांना कोरोनामुळे मृत्यु झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे . त्या मुलीला सोबत घेवुन यावल येथे येण्यासाठी ते रवाना झाले आहे . दरम्यान पोलीस उपनिरिक्षक विनोद रवांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी उत्तर प्रदेश पोलीसांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले .