यावल (दिपक नेवे) – तालुक्यातील दोणगाव ग्राम पंचायतच्या माध्यमातुन पुढील महीन्यात आगमन होणाऱ्या वरूणराजाच्या पार्श्वभुमीवर पावसाळा सुरू होण्यापुर्वीच गावातील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल या सुरक्षेच्या दृष्टीने युद्धपातळीवर पाणीपुरवठा करणा-या बोरींग व त्यांच्या आजुबाजुच्या परीसर तसेच गावातील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम अंतर्गत साफसफाई करण्यात आली, याशिवाय पावसाळ्यात गावातील नागरीकांना मुबलक व शुद्ध पाणी मिळावे व ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी व उत्तम राहावे यासाठी डोणगाव ग्रामपंचायतीमार्फत ही स्वच्छता मोहीम राबवीण्यात येत आहे.
यावेळी गावातील जेष्ठ नागरीक साहेबराव भाऊराव पाटील,भगवान रामचंन्द्र पाटील आसाम रायफलचे जवान योगेश सुरेश पाटील,भरत गुलाबराव पाटील ग्रामपंचायत शिपाई ईश्वर निंबा पाटील,विलास अशोक कोळी, उप सरपंच मनोहर पाडुरंग भालेराव,शांताराम अरूण पाटील इतरांसह राँयल फौजी योगेशभाऊ मित्र परीवारातील सदस्य उपस्थीत प्रामुख्याने या ग्रामपंचायतच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.