यावल (दिपक नेवे)- स्व . राजीव सातव यांच्या रुपात देशातील युवकांना प्रेरित करणारी संस्था आज आपल्यातुन हरपली असुन , पक्षात कधी ही भरून न निघणारी ही क्षती असल्याचे मनोगत व्यक्त करून स्व . सातव यांना शोकसंदेश देवुन आज काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावल येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात आज सकाळी १०वाजता कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील अत्यंत लोकप्रिय व सर्वांना प्रिय असे खासदार व उत्कृष्ट संसदरत्न स्वर्गीय राजीव सातव यांचे काल पुणे येथे उपचार सुरू असतांना दुखद : निधन झाले , आज सकाळी त्यांच्या कळमनुरी जिल्हा हिंगोली गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , त्यांच्या या आकाली निधनाने संपुर्ण काँग्रेस पक्ष परिवार दुखाच्या संकटात बुडाला असुन , यावल येथे त्यांना आज काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे व इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष कदीर खान , पुंडलीक बारी , अनिल जंजाळे , समाधान सोनवणे , नईम शेख , सकलेन शेख , उस्मान खान यांच्यासह आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित स्व .सातव यांना भावपुर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली . यावेळी प्रभाकर अप्पा सोनवणे व भगतसिंग पाटील यांनी स्वर्गीय राजीव सातव यांनी केलेल्या सामाजीक व राजकीय जिवन पटलावरील त्यांच्या उल्लेखनिय कार्यांचा गौरव करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .