रावेर,(विनोद कोळी)- रावेर शहरात लसीकरण केंद्र वाढवा व वयवर्षं १८ च्या वरील युवकांसाठीच्या लसीकरणाला गती द्या त्याचप्रमाणे ठिकठिकाणी केंद्र सुरू करा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन यांच्या नेतृत्वाखाली व रा.कॉ. विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस गौरव महाजन यांच्या उपस्थितीत तहसिलदार उषाराणी देवगुणे मॅडम व रावेर नगरपालिका मुख्याधिकारी रविंद्र लांडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. रावेर शहरात कोविड- १९ ची लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शहर वासीयांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील लोकसंख्या व शहराचा विस्तार पाहता एक लसीकरण केंद्र पुरेसे होत नाही. आणि त्यामुळे ४५ वर्षाच्या वरील अनेक जेष्ठ नागरिकांचे लसीकरण अद्यापपावेतो बाकी आहे.
तसेच १८ वर्षाच्या वरील युवकांसाठी लसीकरणाला गती देण्यात यावी. व त्यासाठी शहरात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात यावे. सद्यस्थितीमध्ये जेष्ठ नागरिकांना लसीचे टोकण वाटप केल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा त्यांना घरी परतावे लागत आहे. आणि २ ते ४ दिवस त्यांना हेलपाट्या माराव्या लागत आहे. तसेच यातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारला जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून शहरात वेगवेगळ्या परिसरात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे.अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थित रा.कॉ. पदवीधर शहराध्यक्ष विवेक पाटील, सूर्यकांत शिंदे, विकास महाजन, निखिल महाजन, रोशन पाटील, रुपेश महाजन, चेतन महाजन, कॉन्ट्रॅक्टर अभिजित नाईक, शुभम पाटील आदीजन उपस्थित होते.