जळगाव, (प्रतिनिधी)- तालुकास्तरावर स्थानिकांसाठी ऑफलाईन नोंदणी व्हावी जेणे करून नोंदणीचा गोंधळ कमी होऊन, लसीकरण सुविधा सुलभ-सुरळीत चालेल याबाबत आ. राजुमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी खासदार रक्षाताई खडसे व जि.प.अध्यक्ष रंजना पाटील उपस्थित होते.
लसीकरणाच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला उशीर होतं असल्या कारणाने लसीकरणाला उशीर होतं असून सामान्य नागरिकांची तारांबळ उडत असल्याने ऑफलाईन रजिस्ट्रेशन ची मागणी होतांना दिसत आहे.