मुक्ताईनगर, (प्रमोद सौंदाणे)- कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत आहे त्याचप्रमाणे मुक्ताईनगर मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे तसेच इतर तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत त्यातच शासनाने बाजारपेठ तसेच सर्व दुकाने अकरा वाजे नंतर बंद असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णांना नाश्ता नाश्ता चहा तर सोडाच परंतु जीवनावश्यक असं पाणी सुद्धा मार्केटमध्ये कुठे मिळत नाही त्यासाठी संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर च्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी पुढाकार घेऊन मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात चहा नाश्ता आणि शुद्ध पाण्याची सोय करून दिली आहे.
याप्रसंगी अडवोकेट रोहिनी ताई खडसे खेवलकर मा जी कृउबा सभापती निवृत्ती भाऊ पाटील माझी पंचायत समिती सभापती राजू माळी माजी सरपंच प्रवीण पाटील तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे अक्षय पालवे,अरुण पालवे राजू कापसे आदी उपस्थित होते