- ‘मल्हार कम्युनिकेशन्सने‘ दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श
- रक्तदान करून केला सी.ई.ओ. आनंद मल्हारा यांचा वाढदिवस साजरा
जळगाव – ‘रक्तदान’ म्हणजेच जीवनदान हाच विचार मनी घेत उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य जाहिरात एजन्सी म्हणून ओळखले जाणारे ‘मल्हार कम्युनिकेशन्स’ च्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले सी.ई.ओ आनंद मल्हारा यांचा वाढदिवस साजरा केला. आनंद मल्हारा यांच्या वाढदिवशी दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे ‘मल्हार कम्युनिकेशन्स’ चे सहकारी वाढदिवस साजरा करतात,याच हेतूने यावर्षी देखील इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त पुढाकाराने ‘एक दिवसीय रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. प्रसंगी आनंद मल्हारा यांनी स्वतः पहिले रक्तदान करून या शिबिराला सुरुवात केली. यानंतर कर्मचाऱ्यांनी देखील स्वेच्छेने सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदानाचा सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे रेड क्रॉस सोसायटीकडून सी.ई.ओ आनंद मल्हारा यांना सन्मानपत्र देण्यात आले तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मानवतेची ज्योत प्रज्वलित ठेवाण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार देखील व्यक्त करण्यात आले.