वरणगाव,(अंकुश गायकवाड):- वरणगाव येथे शिवभोजन केंद्राला भेट देण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील वरणगाव येथे आले असता येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांनी कोविड केअर सेंटरचे मागणी लावून धरले प्रसंगी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर हे देखील उपस्थित होते केअर सेंटर बाबत चंद्रकांत बडे सर व सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर विश्वस्त मंडळाचे काही विश्वस्त उपस्थित होते प्रसंगी विश्वस्त मंडळाने त्यांचे लोक कल्याण रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले व तशा आशयाचे पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद व प्रशासन नगरपरिषद यांना दिले सदर कबीर केअर सेंटर सुरू व्हावे यासाठी आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,प्रांताधिकारी भुसावळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्वरित कोविड केअर सेंटर सुरू करण्याची विनंती केली व ती मान्य झाली असून सदर बाबतीत जिल्हा निबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याशी देखील आमदार पाटील यांनी चर्चा करून रुग्णालयाची इमारत त्वरित खाली करून देणेबाबत सूचना केल्या व त्यांनी मान्य करून इमारत त्वरित खाली करून देतो असे सांगितले.
याबाबत शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सा कार्यालयात जाऊन डॉक्टर जयकर यांची भेट घेऊन त्यांना खालील प्रमाणे निवेदन सादर केले व रुग्णालयाची इमारत ताब्यात घेऊन त्वरित कबीर केअर सेंटर सुरू करावे व रुग्णांना दिलासा द्यावा याबाबत विनंती केली प्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बी डी पाटील व चंद्रकांत हरी बढे सर यांनी सदर इमारतीत रुग्णालय सुरू करणे बाबत सहमती दर्शवली व आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री समीर शेख यांच्याशी चर्चा करून पत्र सादर केले प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन, विश्वस्त मंडळाचे चंद्रकांत हरी बढे सर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एडवोकेट मनोहर खैरनार,उपजिल्हा संघटक शिवसेना जळगाव विलास मुळे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, क्रांतिसूर्य महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष माळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे उपस्थित होते. चर्चा होऊन ते त्वरित आदेश काढून दोन दिवसात कॉल सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही करणार आहेत असे चर्चेअंती ठरले.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जळगाव जिल्ह्यात कोविड – १९ या साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज दुसऱ्या लाटी मध्ये इतका हाहाकार माजला असतांना, वरणगाव या नगरपंचायत कार्यरत असलेल्या सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या ठिकाणी व या शहरास सुमारे २१ ग्रामीण खेडे लागू असताना वरणगाव येथे कोविड केअर सेंटरची सुविधा नाही तसेच या परिसरातील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत नागरिक भुसावळ बोदवड येथे कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी जाण्यास तयार नाही, त्यामुळे असे नागरिक परिसरातच फिरत असतात अशा बाधितांची नोंद घेऊन त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच वरणगाव येथे धर्मादाय कायद्यांतर्गत असलेल्या बंद स्थितीतील ‘लोक कल्याण रुग्णालय’ रुग्णालयाची इमारत वैद्यकीय साहित्य सामग्री रिकामी पडली असताना अशा आपत्ती काळात, लोक साथीने बाबतीत आजाराने मरण्याचे आकडे दिवसेंदिवस वाढत असताना आणि पुन्हा तिसऱ्या लाटी चे संकट डोक्यावर असातांना निव्वळ तांत्रिक अडचणी निर्माण करून एखाद्या शासकीय प्रशासकीय व निमशासकीय इमारतीची सेंटर उघडने अत्यावश्यक आहे.तरी आणखी अधिक वेळ न घेता वरणगाव नगर परिषदेस त्यांच्या मागणी नुसार कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी ही विनंती आहे.अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनावर समाधान महाजन, मनोहर खैरणार, चंद्रकांत बडे सर, विलास मुळे,सुभाष चौधरी आणि संतोष माळी यांच्या सह्या आहेत व निवेदन देताना ते हजार होते.