देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकूळ घातला असतांना आता कोरोना बाधित रुग्णांनमध्ये म्यूकोसल मायकोसिसचा (Mucor Mycosis) संसर्ग पाहायला मिळत आहे. यात धक्कादायक बाब अशी की,या आजारावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांना त्यांचे डोळे काढून घ्यावे लागल्याची घटना समोर आली आहे.गुजरात राज्यतील सूरत शहरात या आजारच्या ८ रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे.तर अनेकांना जीवही गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्ष दीड वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याच्या पाठोपाठ आता गुजरात मध्ये या आजाराने कहर चालवला आहे. म्युकर मायकोसिस (Mucor Mycosis Treatment) या आजाराचे गेल्या दहा ते पंधरा दिवसांत ४० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.
म्यूकोर मायकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग आहे. नाक आणि डोळ्याला हा संसर्ग होतो. आणि डोळ्यांतून आणि नाकातून मेंदूपर्यंत पोहोचतो.दरम्यान, वेळीच उपचार न केल्यास या आजारामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच अंगावर काढल्यास हे संक्रमण खूप धोकादायक ठरू शकते.
कोरोना संसर्ग झाल्यानं काही रुग्णांना डोळ्यांची समस्या निर्माण होते किंवा अनेकांचे डोकेदुखू लागते. तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर, त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. या त्रासामुळे म्युकोर मायकोसिस फंगलचे इन्फेक्शन होऊ शकते. याचे इन्फेक्शन डोळ्यापर्यंत जाते. त्यानंतर चोवीस तासामध्ये मेंदूपर्यंत जाते. यावेळी अशा परिस्थितीमध्ये रुग्णाचे डोळे काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. मात्र, जर तसे नाही केल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.