राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र लहान मुलांवर कोरोनाचा प्रभाव अधिक झाल्याचं दिसून येत असल्याने आता नव्याने ही चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागा कडील आकडेवारी नुसार १ ते १० वयोगटातील १ लाखापेक्षा अधिक मुलांना करोना झाला आहे. हे संक्रमण मार्च आणि एप्रिल मध्ये अधिक झपाट्याने वाढल्याचेही दिसून आले आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागणाऱ्या मुलांची संख्या अधिक वाढली आहे. ११ ते २० वयोगटात करोना बाधितांची संख्या ३ लाखाच्या वर पोहचली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलांवर कोरोनाचा प्रभाव काहीसा दिसून आला होता मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत नवजात बालकांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले आहे.