जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ८५८ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून आज १००५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून जिल्ह्यासाठी ही बाब दिलासादायक आहे तर आज एकूण १६ बधितांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- १३४, जळगाव ग्रामीण- ३५, भुसावळ- १२०, अमळनेर-२५, चोपडा-४१, पाचोरा-७५, भडगाव-९, धरणगाव-२२, यावल-३२, एरंडोल- २३, जामनेर-५९, रावेर-३२, पारोळा-२३, चाळीसगाव-१०७, मुक्ताईनगर-६५, बोदवड-४७ आणि इतर जिल्ह्यातील ९ असे एकुण ८५८ बाधित रूग्ण आढळले आहे.
दिलासादायक….
जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (149 ने) जास्त असून ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (163 ने) झाली कमी झाली आहे तर दैनंदिन बाधितांच्या मृत्यूतही (2 ने) घट झाली.