मुंबई – बापमाणूस’ या मराठी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झालं.
अभिनेत्री अभिलाषा पाटील यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिलाषा या काही दिवसांपूर्वी कामानिमित्त वाराणसी येथे गेल्या होत्या. तिथे त्यांना ताप येत असल्याने त्या मुंबईत परतल्या व कोरोना चाचणी केली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.अखेर उपचारादरम्यान काल त्यांची प्राणज्योत मालवली.
सुशांत सिंग सोबत ‘छिछोरे’ चित्रपटासह, ‘मलाल’, ‘प्रवास’,‘बायको देता का बायको’ यांसारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटांत देखील त्यांनी काम केलं होतं.