जळगाव, (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानं राज्य सरकारवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं जोरदार हल्लाबोल चढवीला आहे. मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलचं तापलं असतांना भाजपचे जळगाव लोकसभा मतदार संघांचे खासदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता पवारांवर जळजळीत टीका करत अखेर पावसात भिजून लबाडीने काबीज केलेल्या अदृश्य हाताने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाच असा आरोप ट्विट करून केला आहे.
पश्चिम बंगाल च्या निवडणुक निकालानंतर शरद पवारांच्या अदृश्य हात असल्याची होती चर्चा…
पश्चिम बंगालच्या निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी एक गौप्यस्फोट केल्याचं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं होतं.शरद पवार यांनी पश्चिम बंगाल मध्ये सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचाचं फटका भाजपला बसला असं भाजपाचे कैलास विजयवर्गी यांनी म्हटलं असल्याचा दावा आव्हाड यांनी केला या ट्विट च्या माध्यमातून केला होता. तर विजयवर्गी यांनी केलेल्या विधानाचा अर्थ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता,’ असं आव्हाडांनी म्हटलं होतं. तेव्हापासून राज्यात शरद पवारांच्या या अदृश्य हातांची जोरदार चर्चा होती.तर सातारा लोकसभा मतदार संघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेसाठी पवारांनी मुसळधार पावसात भाषण सुरु ठेऊन सर्वांनाच अवाक केलं होतं या सभेची देखील मोठी चर्चा झाली होती.
दरम्यान खासदार उन्मेष पाटील यांनी त्यामुळेच शरद पवार यांचं नाव न घेता पावसात भिजून लबाडीने काबीज केलेल्या अदृश्य हाताने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसालाचं अशी जळजळीत टीका केली आहे.