जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे २० टन ऑक्सिजनचा साठा आज जळगावात उपलब्ध करून दिला व तो जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केला असल्याची माहिती माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी ट्विट करून दिली आहे.यामुळे काही प्रमाणात जिल्ह्यातील ऑक्सिजन बाबत दिलासा मिळणार आहे.
उपलब्ध करून देण्यात आलेला ऑक्सिजन आपात्कालीन स्थितीत उपयोग होणार आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्येही हा साठा उपयोगात आणला जाईल असं देखील ट्विट मध्ये नमूद करण्यात आलं आहे.