नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असतानाचं दक्षिण भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंता वाढली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळून आला असून या नव्या स्ट्रेनला N44OK असे नाव देण्यात आले आहे. या नव्या स्ट्रेनची तीव्रता १५ पटीने अधिक असल्याचे सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीलतील शास्त्रज्ञांनी स्पष्ट करताना सांगितलं आहे. या स्ट्रेनमुळे ३ ते ४ दिवसात रुग्ण कोरोनाबाधित होतो आणि मृत्यूचाही धोका वाढतो असल्याचं सांगण्यात येत आहे.