भारताला इशारा देत कोरोनाबाबत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भाकीत वर्तवले असून त्यांनी अजून वाईट स्थिती निर्माण होईल असे भाकीत ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत वर्तवले आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दररोज कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि अपुऱ्या पडत असलेल्या सुविधां अभावी होणारी रुग्णांची हेळसांड त्यामुळे तर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. तर दूसरीकडे ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा ही तर वेगळीच समस्या आहे.रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांना बेड मिळणे अवघड झाले आहे.कोरोनामुळे भारतात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.