संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी (mamata banerjee) या सरस ठरत दोनशेच्या वर जागा मिळवून सत्ता कायम राखली असून देशभरातून ममता दीदींच कौतुक होतं असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांनी देखील ट्विट करून अभिनंदन केलं आहे.
पश्चिम बंगालमधील(west bangal) विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता दीदी यांचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम बंगालमधील लोकांच्या सेवा करण्यासाठी तसंच करोना संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपाला दिलेल्या लढती बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतं कौतुकही करण्यात आलं आहे.