यावल, (प्रतिनिधी)- राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यानं रा. स्व. संघ स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यावल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावल शहरातील गंगेश्वर महादेव मंदिर परिसर,गंगाराम नगर या ठिकाणी रक्तदान शिबीर होईल.यावेळी रक्तदान करण्यासाठी नोंदणी देखील करू शकणार असून जतीन बोरसे – 7387991219, रुपेश वारके – 9595459657, अनिकेत सोरटे – 9284173624 या मोबाईल वर संपर्क करून नाव नोंदणी करण्याचं आवाहन आयोजकांनी केले आहे.