राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या चूरशीच्या लढतीत अखेर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे विजयी झाल्यानंतर भाजप व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून भाजपच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा विजय म्हणजे महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्या सारखं असल्याची खोचक टीका केली आहे.
माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टिकेवर पलटवार करतांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून म्हटलं की,फारच लवकर उन्मत्त झालात. तिकडे पश्चिम बंगाल मध्ये तुमच्या विश्वगुरू पासून, संन्याशापर्यंत अख्खे तंबू ठोकून होता. तुमचा दारुण पराभव म्हणजे एका ममता नावाच्या वाघीनीने अख्याचे थोबाड रंगवले त्याचं काय?? जास्त हवेत जाऊ नका पाटील गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे थोबाड रंगवले गेले आज. असा टोला लगावला आहे.