पंढरपूर – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या चूरशीच्या लढतीत अखेर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे विजयी झाले आहे.याबाबत औपचारिक घोषणा निवडणूक आयोगाकडून होणे मात्र बाकी आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पराभूत करत भाजपचे समाधान अवताडे विजयी झाले आहेत.मतमोजणीच्या ३६ व्या फेरी अखेर भाजपाच्या समाधान अवताडे यांना १०४२८५ इतकी मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना १००१८३ एवढी मतं मिळाली.