संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कल जाहीर होत असून ममतादीदींनी एकहाती टक्कर देत थेट २०७ जागांवर मुसंडी घेत आघाडीवर आहेत अंतिम निकाल येणं बाकी असला तरी कल मात्र ममता दीदींच्या बाजूनं दिसत आहे. या निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून ममतादीदी यांचं अभिनंदन केलं आहे.
शरद पवार यांनी ट्विट करून ममता दीदींचे जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन केले असून
लोकांच्या कल्याणासाठी आणि साथीच्या रोगाला साथीने सामोरे जाण्यासाठी आपण आपले कार्य चालू ठेवूया, एकत्र येऊन लढा देऊ असं म्हटलं आहे.