जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिषेक पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी व्हाट्सअप द्वारे संदेश पाठवून कळविले आहे.
अभिषेक पाटील यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे की,माझा कोविड -19 अहवाल POSITIVE आला असुन, वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे, तरी माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. तसेच काल माझ्या वाढदिवसा निमित्त मित्र परिवार व हीतचींतकांनी शुभेच्छा दिल्यात त्यांचा मी मनःपुर्वक स्विकार करत असल्याचं म्हटलं आहे.