जळगाव, (प्रतिनिधी)- स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या आठव्या स्मृतीदिना निमित्त आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणी येथील “निखिल खडसे स्मृतिस्थळ” येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे उपस्थित होत्या.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आवाहनानुसार ‘ब्लड फॉर महाराष्ट्र ‘ अभियानअंतर्गत स्व. निखिल खडसे यांच्या स्मृती दिनानिमित्त मुक्ताईनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी १३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.