यावल,(दिपक नेवे)- तालुक्यातील साकळी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत सर्वेक्षण सुरू असताना जळगाव जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फछोटु पाटील, तहसीलदार महेश पवार तसेच यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन कुतुबुद्दीन शेख यांनी भेट दिली याप्रसंगी सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांनी नागरिकांनी covid-19 या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय नियमांचे पालन करून स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व समय सुचकता बाळगुण आपली वेळ येईल त्यावेळेस कोवीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मार्गदर्शन केले.
सर्वेक्षण केंद्र प्रमुख किशोर चौधरी यांनी पंचक्रोशीतील साकळी परिसरात साकळी, शिरसाड, मनवेल, दगडी, थोरगव्हाण व पिळोदा येथील आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण संदर्भात माहिती दिली. साकळी परिसरातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन होत असलेल्या कोरोना संदर्भातील जनजागृती व रुग्णांची घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती जाणुन घेतली तहसीलदार महेश पवार समाधान व्यक्त केले व कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनास जनजागृती व शासनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी आणी सर्वेक्षण अधिकाधिक प्रभावी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील सर्वेक्षण कर्मचारी शिक्षक, आशा वर्कर प्रामुख्याने उपस्थित होते.