रावेर,(भागवत महाजन) – विवरे येथे कोविड मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या राज्यव्यापी मोहीमेस विवरे येथे ग्रामीण क्षेत्रात ही सुरूवात करण्यात आली असून विभागीयआयुक्त यांनी लावलेल्या २८ एप्रिल ते २ मे कालावधी सर्वेक्षणास विवरे येथीलल नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रांपचायती क्षेत्रात आशासेविका शिक्षक अंगणवाडी सेवीका आरोग्य सेवक असून घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती शासनाने दिलेल्या ॲपवर नोंदणी करून घेत आहेत व सर्वेक्षण झालेल्या घरावर स्टिकर लावत आहेत.
घरांना भेटी देत आशासेवीका त्यांची आरोग्य तपासणी करून माहिती संकलित केलेली आहे. तसेच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याचीही माहिती घेतली जात असून कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी आहेे काय अशीही माहिती संकलित केली जात आहे.
व्यक्तीची आरोग्य विषयक माहिती घेण्यासोबत प्रत्येकाला नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, काही सहव्याधी असल्यास नियमित औषधोपचार घेणे, प्लाझमा डोनेशन अशी विविध प्रकारची कोरोना विषयक माहिती दिली जात आहे व व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे.
आशासेविका अंगणवाडी सेविका सर्वेक्षण दरम्यान रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी विवरे गावात सर्वेक्षण चालु आहे की नाही हे पाहण्यासाठी विवरे गावात भेट दिली . त्यांनी नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजणी करा व त्याच्या नव्या नोंदी घ्या तसेच त्यावेळेची आरोग्य स्थिती लक्षात घेऊन योग्य ते मार्गदर्शन करा असे आशासेविका यांनां सांगितले .
या सर्वेक्षणातून संकलीत होणा-या माहितीच्या आधारे लक्षणे आढळणा-या नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासोबतच आगामी काळात सहव्याधी असणा-या किंवा इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे.
तरी आपले विवरेगाव कोव्हीड मुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरी सर्वेक्षणासाठी येणा-या पथकातील करोना दूतांना सत्य माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करावे तसेच स्वयंशिस्तीचे पालन करून कोव्हीड आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहचणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी नागरिकांना असे आवाहन रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे. उपस्थित मंडळअधिकारी – सचिन पाटील, तलाठी तेजेस पाटील , माजी सरपंच वासुदेेव नरवाडे ग्रापंचायत सदस्य युसुफ खाटीक, पोलीस पाटील योगेश महाजन , आशासेविका सुुभद्रा पाटील ,आशा मानकरे ,सुरेखा विचवे ,ग्रामपंचायत कर्मचारी कुंदन पाटील , रामदास वानखेडे . उपस्थित होते .