जळगाव,(प्रतिनिधी)— कोरोना आजारास भलेभले घाबरून जातात त्यातच ६० सॅच्युरेशन आणि सी.टी स्कोर २० असेल तर मग रूग्ण हातचा गेला म्हणून हातपाय गळून जातात पण ११ वर्षीय अत्यावस्थ पूजा मोरे ही मात्र अपवाद ठरली आणि ११ दिवसात पुर्ण बरी झाली आहे.डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयात पुजावर यशस्वी उपचार करण्यात आले.
१९ एप्रिल रोजी ११ वर्षीय पुजाचे आईवडील अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत कोविड इन्चार्ज एन जी चौधरी यांना भेटले.आम्ही सर्व रूग्णालय फिरलो आहे आणि माझे भाचीला कुणी अॅडमिट करून घ्यायला तयार नाही तिला आयसीयु बेडची गरज आहे असे सांगीतले.एन जी चौधरी यांनी ताबडतोब ही बाब डॉ. वैभव पाटील यांच्या कानावर टाकली. डॉ. वैभव पाटील यांनी सॅच्युरेशन चेक करण्यास सांगीतले तेव्हा ६० लेव्हल आली होती.
फिजीशियन डॉ. चंद्रया कांते, डॉ पाराजी बाचेवार यांना लगेच बोलावून सी. टी स्कॅन करून घेण्यात आला. यावेळी तिचा सी.टी स्कोर २०/२५ आला. पूजाच्या आई व मामाला धिर देत अतिदक्षता विभागाची काही गरज नाही आम्ही सर्व ठीक करतो असे सांगून ऑक्सीजन बेडची व्यवस्था ताबडतोब करण्यात आली. यानंतर बालरोग तज्ञांच्या सहायाने औषधीची मात्रा ठरवण्यात येउन दर एक तासाने सॅच्युरेशनवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
सतत १० दिवस चौविस तास तिच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याने तिचे सॅच्युरेशन ७/८ दिवसात ८० च्यावर आलेे आणि आज ११ व्या दिवशी ऑक्सीजन शिवाय तिचे सॅच्युरेशन जवळपास नॉर्मल म्हणजे ९२/९५ इतके येत असल्याने तिला घरी पाठवण्यात आले.या अकरा दिवसात पूजावर सुकन्या वानखेडे, जुबेर खाटीक , साक्षी बखाले, ज्युही नाईक व रूचीका टिंगणे,पदमावती या स्टाफ नर्सने लक्ष केंद्रीत करून उपचार केले. तिच्या प्रत्येक हालचालीवर आर एम ओ डॉ विष्णू नागूलकर यांचेसह डॉ. अतुल फोगाट, डॉ. सागर झिंजुर्गे, डॉ.ओंकार उघडे, डॉ प्रविण प्रजापती, डॉ.रूषीकेश देशमूख, डॉ भुषण या टीमने बारीक लक्ष ठेवले असल्याने आज तिने कोरोनावर मात केली.
या ११ दिवसात पूजाने देखिल न घाबरता या आजाराचा मुकाबला केला. आईवडील जवळ नसले तरी प्रत्येक गोष्ट हटटाने स्टाफकडे मागणी करून मिळवत हसत खेळत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कोरोनावर विजय मिळवला.
मोरे कुटुंबाच्या लक्ष्मीला जिवदान मिळाल्यानंतर माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी उभारलेले हे रूग्णालय आमच्याकरीता देवालयच असून डॉ वैभव पाटील हे देवदूतच असल्याची भावना बोलून दाखवत येथील सोयी सुविधा व उपचाराबददल समाधान व्यक्त करत रूग्णालय प्रशासनाचे आभार पूजाच्या मातापित्यांनी व मामाने मानले.
अत्याधुनिक सुविधांमूळे पूजावर उपचार करणे शक्य झाले.
रूग्णालयात आरटीपीसीआर, सी.टी स्कॅन, तसेच ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी आधीच करून ठेवली आहे. याचबरोबर सर्व सुविधा एकाच छताखाली असल्याने तिच्यावर उपचार करणे व त्यातून तिला बरे करणे शक्य झाले असे गोदावरी फॉउंडेशनचे सदस्य डॉ. वैभव पाटील यांनी सांगीतले.
पुजावर उपचार करणा—या डॉ.विष्णु नागुलकर यांनी तिच्या उपचाराबददल माहिती देतांना इतक्या लहान वयात या मुलीला सीटीस्कोर मधुन इन्फेक्शन समोर आल्यावर आमच्या घरातील आमची लाडकी बहीण तिच्यात बघीतली. रोज सकाळी वरीष्ट डॉक्टरांचा राउंडमध्ये तिच्या बेडपाशी जाउन पुर्ण तपासणी करून घेत व सर्व अपडेट देउन तिच्याबाबतीत सुचना लक्षात घेतल्या, तिच्या प्रत्येक हालचालीवर प्रत्येक शिप्टमधील माझे सहका—यांनी अगदी बारकाईने लक्ष ठेवले. ती पुर्ण बरी झाल्यावर आमचा आनंद गगनात मावला नाही.