नवी दिल्ली – टीव्ही पत्रकार वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज दिनांक ३० एप्रिल रोजी निधन झालं असून रोहित सरदाना यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मीडिया विश्वात शोककळा पसरली आहे. पत्रकार, राजकीय नेते व सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
प्रखर राष्ट्रवादी पत्रकार हरपला..
रोहित सरदाना यांचे आकस्मिक निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. पत्रकारितेतून अनेक प्रश्न त्यांनी मांडले होते, त्यांच्या जाण्याने मीडिया क्षेत्रावावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.