यावल (दिपक नेवे)- राज्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीने थैमान घातले असुन आरोग्य व उपचाराच्या नांवाखाली खाजगी रुग्णालयात असो वा शासकीय रुग्णालयायात गोरगरीबाची मोठी आर्थिक लुट करण्यात येत असल्याच्या तक्रारींचा पाऊस सुरू झाला असुन , उपचाराअभावी असंख्य रुग्णांना आपले जिव गमवावे लागत आहे.
याच पार्श्वभुमीवर काँग्रेस सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्य पातळीवर कोवीड१९शी समर्थपणे लढा व उपचाराच्या नांवाखाली कुणावरही अन्याय होता कामा नये म्हणुन जिल्हा निहाय१९ कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असुन, या राज्य पातळीवरील १९ जणांच्या कार्यकारणीत कोरपावली तालुका यावल येथील तरूण तडफदार काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते जलील सत्तार पटेल यांची व भुसावळच्या मिनाक्षी जवरे निवड कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष अॅड सुभाष गोडसे व सुयोग हिवाले (सोशल एक्टीवेटीस महाराष्ट्र ) यांनी केली असुन , जलील पटेल हे आज जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक एन .एस . चव्हाण यांची भेट घेवुन त्यांच्या सोबत जिल्ह्यातील विविध कोवीड सेन्टरचा तपसिलवार आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे .