यावल (दीपक नेवे)- तालुक्यात महसुल प्रशासनाच्या पथकांची विनापरवाना अवैध गौण खनिज वाहतुकी विरूद्ध धडक मोहीम दोन दिवसात दोन डंपर दोन ट्रॅक्टर वर झाली कार्यवाही वाळु माफीयाचे धाबे दणाणले आहे.
या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महसुलच्या पथकानेअवैद्य गौण खनिज विरूद्ध उघडलेल्या मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील किनगाव येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप व त्यांचे भागातील तलाठी बामणोद मंडळ अधिकारी मिलींद देवरे व तलाठी,यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी व तलाठी, साकळीचे मंडळ अधिकारी पि ए कडनोर व तलाठी यांनी वाळु माफीया विरुद्ध मागील दोन दिवसात राबविलेल्या कार्यवाहीच्या धडक मोहिमेत विनापरवाना अवैध मार्गाने वाळुची वाहतुक करणारे दोन डंपर व दोन ट्रॅक्टर तालुक्यातील विविध क्षेत्रातुन कार्यवाहीसाठी जप्त करण्यात येवुन पुढील दंडात्मक कार्यवाही करीता यावल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. दरम्यान तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज ची विनापरवाना वाहतुक करणाऱ्या वाळु माफीयाचे चांगलेच धाबे दणाणले आहे .