नशिराबाद,(प्रतिनिधी)- उड्डाण पुलाला ग्रामदैवत श्री झिपरु अण्णा महाराज उड्डाण पुल असे नाव देण्याची झिअम फाऊंडेशन अध्यक्ष प्रदिप साळी यांनी मागणी केली आहे.
नशिराबादचे ग्रामदैवत नशिराबाद कराचे श्रध्दा व जाग्रुत देवस्थान असुन मुंबई व पुणे विदर्भ गुजरात व इतर राज्य त्यासह परदेशातील भाविक या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाला येतात तसेच या पावन भुमित महाराजांनी चमत्कार केले असुन महाराजांचे नाव देण्याने गावात वैभव व नावलौकिक भर व चैतन्य निर्माण होईल आणि परम पुज्य श्री झिपरु अण्णा महाराज यांच्या नावाने नशिराबाद जवळील उड्डाण पुलाला संबोधित करण्यात यावे व हे नाव जर दिले तर गावातील नागरिकांना मध्ये ही आनंद होईल आम्हच्या मागणीचा योग्य विचार करुन उड्डाण पुलाच्या लवकरात लवकर नामकरण करावे अशी मागणी झिअम फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रदिप साळी यांनी सिन्हा साहेब संचालक राष्ट्रीय महामार्ग नही जळगांव याच्याकडे केली.
यांनी सांगितले आपल्या मागणी योग्य विचार करण्यात येईल त्यावेळी झिअम फाऊंडेशन चे सदस्य दिपक जावरे आकाश देवळे आदि उपस्थित होते