जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हतभल झाले आहे. भारतातही कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावला आहे. लॉकडाऊनचा काळ सर्वांसाठी अडचणीचा आहे. परंतु दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी तो अधिक जास्त आव्हानात्मक असतो.
अशा परिस्थितीत दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ फाऊंडेशन सारख्या अनेक संस्था पुढे सरसावल्या आहे. महाराष्ट्रभरातील आर्थिकदृष्ट्या असक्षम अपंग अनाथ, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या लॉकडाऊन च्या काळात आणि नंतरही शिक्षण,आरोग्य व इतर कुठलीही अत्यावश्यक मदत दीपस्तंभ मनोबल मार्फत करण्यात येत आहे. मागील काही महिन्यांत या उपक्रमाअंतर्गत 210 अनाथ व 240 अपंग विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात आले आहे.
विशेष बाब #-
कोल्हापूर येथील स्थानिक 94 गरजू अनाथ विद्यार्थी काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. लॉक डाऊनमुळे हे विद्यार्थि अडचणीत आली. त्यांना दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे तीन दिवसांपूर्वीच मदत करण्यात आली.
कोल्हापूर मधील मनीषा शिंदे यांनी विद्यार्थ्यांबाबत संस्थेला कळविले. दीपस्तंभ परिवारातील सदस्य श्री. राजेश झोलदेव (दिल्ली) , श्री. एरंडे, श्री. संदीप काटे (सातारा), डॉ. राजेश डाबी यांनी यासाठी योगदान दिले.
दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग,अनाथ विद्यार्थ्यांच्या निवासी निःशुल्क उच्चशिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.
लॉकडाऊन मध्ये अपंग अनाथ विद्यार्थ्याना कुठलेही अत्यावश्यक सहकार्य लागल्यास त्यांनी संस्थेच्या 8380038713 या क्रमांकावर संपर्क करावा. उपक्रमासंदर्भात अधिक माहिती संस्थेच्या www.deepstambhfoundation.org या वेबसाईटवर दिली आहे.
ज्या व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी होऊन अनाथ ,अपंग विद्यार्थ्यांना मदत करावयची असल्यास त्यांनी संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.