जळगाव,दि.28 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2021-22 फळबाग लागवड कार्यक्रमातंर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेत आंबा, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, बांबू, मोसंबी, चिक्कु, डाळिंब, पेरु, कागदी लिंबु, शेवगा, साग, औषधी वनस्पती, इत्यादी घटकांतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुदान देय राहील.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Good disijan