जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ९९५ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १०६९०१ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या १०९०५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १०१२ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११८९२८ झाली. जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २१२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर १६३, जळगाव ग्रामीण ५६, भुसावळ ४९, अमळनेर ४६, चोपडा ५३, पाचोरा ५९, भडगाव ३३, धरणगाव २७, यावल २६, एरोंडल १००, जामनेर ५९, रावेर ९२, पारोळा ३७, चाळीसगाव ६४, मुक्ताईनगर १७, बोदवड १२०, इतर जिल्हातील ०७असे रुग्ण आढळून आले आहेत.