जळगाव, (प्रतिनिधी)- कोव्हीड लस बाबत समज गैरसमज न बाळगता पात्र व्यक्तींनी लस टोचून घ्यावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयानं ट्विट करून आवाहन करत अफवांवर नव्हे, आकड्यांवर विश्वास ठेवा आकडे खोटं बोलत नाहीत,लस सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
लस घेण्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये विविध गैरसमज असल्याने लस घेण्यासाठी नागरिक पुढे येतांना दिसत नसल्याने प्रशासनानं नागरिकांनी गैरसमज ठेऊ नये लस पूर्णतः सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं आहे.
लस घेतल्यावर कितीजण पॉझिटिव्ह झाले? जाणून घ्या
लस घेतल्यावर कितीजण पॉझिटिव्ह झाले? याबाबत आकडेवारी दर्शवणारी पोस्ट जिल्हा प्रशासनाने जारी केली असून त्यात असलेली आकडेवारी पुढील प्रमाणे – भारतात आतापर्यंत covaxin चे प्रथम डोस एकूण ९३,५६,४३६ इतक्या पात्र नागरिकांनी लस घेतली असून लस टोचून घेतल्यावर ४२०८ (०.०४ टक्के) तर द्वितीय डोस १७,३७,१७८ इतक्या नागरिकांनी लस घेतल्यावर ६९५(०.०४ टक्के ) इतके पुन्हा पॉझिटिव्ह झाले आहेत.
तसेच covishild चे आतापर्यंत ११.६ कोटी नागरिकांनी लस टोचून घेतली आहे. त्यात प्रथम डोस घेणारे १०,०३,०२,७४५ इतके आहेत. प्रथम डोस घेतल्यावर १७.१४५(०.०२टक्के), तर द्वितीय डोस १,५७,३२,७५४ इतक्या नागरिकांनी घेतल्यावर ५०१४(०.०३टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.
एकूण या आकडेवारी वरून स्पष्ट होतं की लसीकरण करून घेतल्यावर कोरोना संक्रमणाचा धोका कमी झालेला दिसून येतो तर कोरोना चा प्रभाव देखील कमी झाल्याचे दिसून येते. कोरोना लस बाबत समाजात जे काही समज, गैरसमज, अफवा पसरविल्या जात आहे त्या कडे दुर्लक्ष करून नागरिकांनी पूर्णतः सुरक्षित असलेली कोविड लसीकरण करून स्वतःला व इतरांना सुरक्षित करण्याची गरज आहे, म्हणूनच प्रशासनाने सर्व पात्र नागरिकांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले आहे.