कजगाव ता.भडगाव – येथुन जवळच असलेल्या व कजगाव पोस्ट कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सावदे येथील संजय पाटील यांचे सर्पदंश मुळे निधन झाले होते त्यानी कजगाव सब पोस्ट ऑफिस येथे वार्षिक १२ रुपये पंतप्रधान सुरक्षा विमा काढलेला होता त्यामुळे त्यांच्या पत्नींना सुनंदा संजय पाटील यांना पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना अंतर्गत २ लाख रुपये चा धनादेश दि.२४ रोजी कजगाव सब पोस्ट ऑफिस तर्फे देण्यात आला.
वार्षिक १२ रुपये पंतप्रधान सुरक्षा विमा असा लाभ हा संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच कजगाव पोस्टकार्यलयातील विमाधारकास मिळाला असल्याने पोष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ही कौतुक होत आहे.
यावेळी चाळीसगाव उपडाक अधीक्षक मधुकर जगदाळे ,कजगाव चे सब पोस्टमास्टर सुधीर कोळी डाकसेवक संजय महाजन, सुनिल पाटील, शाखा डाकपाल शरद बाविस्कर दीपाली पाटील, पोस्टमन सुजित अहिरे, मेल पर्यवेक्षक रुपेश चौधरी, उपस्थित होते सुधीर प्रकाश कोळी सब पोस्ट मास्टर यांनी विमा चा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले यावेळी चाळीसगाव उपडाक अधीक्षक मधुकर जगदाळे यांनी सांगितले की भारतीय डाक विभाग हे १५० वर्षा पासून जनतेची अविरत सेवा करीत आहे हे याचे ज्वलंत उदाहरण आहे जेथे चिटफंड च्या नावाने लोकांची फसवणूक होत आहे तेथे भारतीय डाक विभाग अजूनही लोकांचे ठेवी सुरक्षित ठेवत आहे.
डाक विभाग अंतर्गत सुकन्या योजना बचत खाते ,रिकरींग खाते जेष्ठ नागरिक खाते असे बचत योजना राबवले जातात सर्वात सुरक्षित ठेव म्हणून अजूनही डाक विभागाला पसंती दिली जाते कोरोनाच्या संकटात सुद्धा पोस्टमन हे जीवाची बाजी लावून टपाल अविरत वितरित करीत आहे पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना वार्षिक फक्त १२ रुपये भरून अपघाती संरक्षण प्राप्त होते व्यक्ती अपघाती मृत पावल्यास वारसाला 2 लाख किंवा अपंगत्व आल्यास 1 लाख असा लाभ मिळतो.
तर पंतप्रधान जीवन ज्योती योजना वार्षिक ३३० रुपये नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख वारसाला मिळतात त्यामुळे पोस्ट हे नेहमी खातेदारांसाठी विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते असे ही जगदाळे यांनी सांगितले त्यामुळे सर्वानी या योजनेचा लाभ घ्यावा अजून माहीत साठी जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी असे आवाहन पोष्ट विभागाकडून करण्यात आले आहे