बोदवड, (सचिन पाटील)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन अॉक्सिजन ड्युरा सिलेंडर साठी बोदवड जिनींग असोसिएशनच्या वतीने आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
बोदवड जिनींग असोसिएशनने जपली सामाजिक बांधिलकी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वाढत्या रुग्ण संख्यामुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण पडत असतांना अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केल्यानंतर बोदवड जिनींग असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दोन लाखाचा धनादेश दिला.