जळगाव, (प्रतिनिधी)- येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना चौधरी यांनी आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला जिल्हा सहकारी बँकेच्या रोहिणी खडसे उपस्थित राहिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, माजी आमदार मनीष जैन यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना काळात भासत असलेला रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. म्हणून जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले.
यावेळी राष्ट्रवादीचे अशोक लाडवंजारी, जामनेर येथील श्री. बोरसे आदी उपस्थित होते.