ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचे निधन झाले.’पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा’ यांसारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली होती. त्यांच्या निधनामुळे लोकगीतांच्या क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.
प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं आज रात्री वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं.हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती.आज रात्री त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.