पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारीकडे करीत नव्याने सुरू होणाऱ्या या कोविड सेंटर ला कॉग्रेस ने मास्क मोफत देण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत. त्यातच खाजगी कोविड सेंटर मध्ये पैशा अभावी काहींना जीव गमवावा लागला आहे. आधीच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक हानी झाली आहे त्यामुळे तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करुन अॉक्शिजन बेड उपलब्ध करावे अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांच्या कडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. यावेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी शिष्टमंडळात तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते. यावेळी नवीन कोविड सेंटर लवकरच सुरू करु लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात पहीला प्रयोग करु असे आश्वासन डॉ वाघ यांनी दिल्यानंतर लगेच याठिकाणी जे कर्मचारी वर्ग आणि रुग्णांना कॉग्रेस कडुन मोफत मास्क चे किट डॉ. वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
चर्चेत अॉक्शिजन साठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लागलीच कॉन्टॅक्टर अबुलेज शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी डॉ. वाघ यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तालुक्यात खुप कोरोना महामारीत सरकारचे कोविड सेंटर उभे राहिले पाहिजे ही गरज असल्याचे मत श्री सोमवंशी यांनी शेवटी म्हटले आहे. त्यातच कोरोना महामारीत प्रत्येक कॉग्रेस कार्यकर्त्याने ग्रांउड लेवल ला कार्य करावे असे मार्गदर्शन देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी खा राहुल गांधी सह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुचना दिल्या आहेत. पाचोरा कॉग्रेस लवकरच हेल्पलाईन सुरू करीत असल्याचे शेवटी सांगितले.