यावल,(दिपक नेवे)-यावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लि . यावल ची कार्यकारीणी सभा आज दि.22एप्रिल2021रोजी झाली.या सभेत सन 2021-2022या कालावधी साठी बैकेच्या उपाध्यक्षपदी महेश वासुदेव वाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बँकेचे अध्यक्ष शरद यावलकर,डॉ.सतीष यावलकर,हेमंत चौधरी,अभिमन्यु बडगुजर,जगदिश कवडीवाले,किरण अट्रावलकर, यशवंत सोनवणे,दिलीप नेवे,सुनिता गडे,बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत वाणी व सर्व कर्मचारी ऊपस्थीत होते.बँकेच्या प्रगती साठी प्रयत्न करणार असल्याचे नुतन उपाध्यक्ष महेश वाणी यांनी निवड प्रसंगी सांगीतले.