जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात १०३० रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १०१७८८ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या १०९२७ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १०४८ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११४७५२ झाली. जिल्ह्यात आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २०३७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर २०४, जळगाव ग्रामीण २८, भुसावळ ९०, अमळनेर ९४, चोपडा ८४, पाचोरा ५३, भडगाव २८, धरणगाव ३४, यावल ३७, एरोंडल २०, जामनेर १०५, रावेर ९७, पारोळा ४६, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ३१, बोदवड २६, इतर जिल्हातील ३१असे रुग्ण आढळून आले आहेत.