मुंबई,- विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलच्या कोविड कक्षाच्या अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ३ च्या सुमारास घडली.
एसीचा विस्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमींना 1 लाख
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.