नाशिक येथे ऑक्सिजन गळती झाल्याने तब्बल २२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून या घटनेने महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही दुःख झाल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे.
महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रातील नाशिकमधील रुग्णालयाच्या ऑक्सिजन टँकमध्ये गॅस गळतीमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने मी फार दु: खी आहे. या अपघातात प्रियजन गमावलेल्या कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी इतर सर्व रूग्णांच्या त्वरित प्रकृती चांगली होण्याची इच्छा ट्विट करून केली आहे.