- छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात कार्यक्रम – दिव्यतेजमध्ये मनोबल फाऊंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव – शहरातील ग्राहकांना प्रथमच खरेदीचे स्वातंत्र्य देणारे (मॉडर्न ट्रेंड) नवजीवन सुपरशॉप आपले 54 वर्षे आज (दि.13) रोजी पूर्ण करीत आहे. त्यानिमित्त शहरातील दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ‘दिव्यतेज’ या म्युझिकल कॉन्सर्टचे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
गुणवत्ता आणि प्रामाणिकता या गुणांवर जळगावकरांची पहिली पसंती असणार्या नवजीवनने आपल्या ग्राहकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. 1964 सालापासून ग्राहकांशी ऋणानुबंध जपत विश्वासार्ह सेवेचे व्रत अखंड जपणारी 55 वर्षांची परंपरा नवजीवन सुपरशॉपला लाभली आहे. त्यामुळे ‘गृहिणींच्या आवडीचे, कुटुंबाच्या निवडीचे’ असलेले ‘नवजीवन’ व्यवसायासोबत कायम सामाजिक बांधीलकीही जोपासत आले आहे.याच सामाजिक बांधीलकीतून 55 व्या वर्धापनदिनानिमित्त दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा जुन्या हिंदी चित्रपटगीतांसह, देशभक्तीपर गीतांची ‘दिव्यतेज’ या म्युझिकल कॉन्सर्टचे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, सर्व जळगावकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून सहपरिवार उपस्थिती द्यावी, असे आवाहन नवजीवन परिवार व दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.