देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सेवा सुरु केली असून यापुढे या बँकेच्या ग्राहकांना आपल्या ‘डेबिट कार्ड’ शिवाय त्यांच्या खात्यातून ‘एटीएम’ मधून विड्रॉल करता येणार आहे.याबाबत बँकेने ट्विट करून एक व्हिडीओ देखील जारी केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी योनो कॅश (Yono Cash) या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
फक्त या बँकेचेच ग्राहक त्यांच्या मोबाइलच्या सहाय्यानेच एटीएममधून कॅश काढू शकतील.ग्राहकांना एका वेळेस या सुविधेच्या माध्यमातून 10 हजार रुपयांची रक्कम एटीएम मधून काढता येईल तर दिवसभरात अशा प्रकारचे दोन ट्रान्झॅक्शन करु शकता. म्हणजेच एका दिवसात 20 हजार रुपये एटीएममधून काढता येतील.
Withdraw cash from any SBI ATM without your Debit Card. Download the app now: https://t.co/NeeHLbI8DP#YONOSBI #YONOCash #YONO #ATM #CardlessWithdrawal pic.twitter.com/JnHeFAWbao
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 18, 2021
एसबीआयच्या वतीने ही सेवा सुरक्षित असल्याचं म्हटलं असून या सुविधेमुळे डेबिट कार्ड च्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीला रोखण्यास मदत देखील होणार आहे.