मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यात आज 67123 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.तर आज नवीन 56783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3061174 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 647933 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18% असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.
राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून देखील कोरोना संसर्गाची वाढती संख्या आवाक्यात यायचं नाव घेत नसल्यानं चिंता व्यक्त होतं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन, बेड, व्हॅन्टिलिटर, रेमडेसीवर चा तुटवडा जाणवत असल्यानं चांगलीच तारांबळ उडत आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज…
राज्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने काळजी घेण्याची वेळ आता आली आहे. सरकार तर त्यांच्या स्तरावर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करेलच परंतु नागरिकांनी देखील काळजी घेणं आता आवश्यक आहे.