नवी दिल्ली : कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचे सबळ पुराव्यातून सिद्ध झाल्याचे संशोधन ‘द लॅन्सेट’ या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करून तसा दावा करण्यात आला आहे.
शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, कोरोना हवेतून परसत आहे आणि त्याचे पुरावे सातत्याने संशोधकांना मिळत आहेत.
कोरोना हवेतून पसरत असल्यानेच जगभरातील सार्वजनिक आरोग्य यंत्रनेला त्याच्यावर अद्याप नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले नसल्याचे ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार हा होतो या दाव्यासाठी या संशोधानात दहा ओळींचे पुरावे देण्यात आले आहेत.
प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार हा होतो. पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते.