जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ११०३ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ९३९७६ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या ११२३९ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १०३३ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १०७१०३ झाली. जिल्ह्यात आज २० रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १८८८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
मात्र आज जिल्ह्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या अधिक असल्याने
ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या घटली ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.
जळगाव शहर 210, जळगाव ग्रामीण 58, भुसावळ 130, अमळनेर 105, चोपडा 87, पाचोरा 79, भडगाव 10, धरणगाव 53, यावल 30, एरोंडल 49, जामनेर 19, रावेर 84, पारोळा 27, चाळीसगाव 37, मुक्ताईनगर 32, बोदवड 01, इतर जिल्हातील 20 असे रुग्ण आढळून आले आहेत.