मुंबई, दि. 15 : राज्यात आज पासून कडक निर्बंध लागू झाले असतांना टाळेबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी भाजीपाला, किराणा घेण्याच्या नावाखाली लोकं अनावश्यक घराबाहेर पडतांना दिसून आले असून लोकं नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन अधिक कडक होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच निर्बंधाचे कडक पालन करण्याबाबत निर्देश देतांना म्हटलं होतं की,गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले आहे.
कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करायची असेल तर नागरिकांना नियम पाळावेच लागणार आहेत असं असतांनाही काही जणांकडून नियम मोडीत विनाकारण घराबाहेर पडतांना दिसून आले आहे.