रावेर/प्रतिनिधी:-दि.14(विनोद कोळी) – रावेर येथे फुले शाहु आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर याची 130 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण दिप व धुप पुजा करुन बुध्दवंदना घेऊन सर्वांनी अभिवादन केले.
यावेळी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर ,सामाजिक समता मंचचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ सवर्णे,कार्याध्यक्ष उमेश गाढे,ॲड. योगेश गजरे, युवा नेते पंकजभाऊ वाघ,जयंती समिती अध्यक्ष सावन मेढे, सचिव संघरक्षक तायडे, कोष्याध्यक्ष् धनराज घेटे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, समता सैनिक दल रावेर तालुका प्रमुख बाळु रजाने,पत्रकार नगीन इंगळेसर,पत्रकार राहुल गाढे, दिलरुबाब तडवी, ईश्वर अटकाळे,राहुल राणे यांच्यासह मान्यव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे केले.